उभादांडा मानसीश्वर येथील पाणीपुरवठा पाईप लाइनसाठी चालू असलेले खोदकाम ग्रामस्थांनी रोखले.
वेंगुर्ला.
तिलारी वरून येणाऱ्या पाणीपुरवठा पाइप लाइनसाठी उभादांडा मानसिश्र्वर येथे चालू असलेले खोदकाम ग्रामस्थांनी रोखले. रस्ता खोदकाम करण्याची परवानगी नसताना खोदकाम कसे केले? असा प्रश्न ग्रामस्थांनी संबंधित अभियंता ना विचारला. रीतसर परवानगी नसेल तर काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा उपस्थित ग्रामस्थांनी घेतला. तसेच रस्ता खोदकाम करून त्यावर सिमेंटीकरण न करता रस्ता डांबरीकरण करून देण्याची मागणी देखील त्यांनी केली. साईट वर काम करते वेळी कोणी अधिकारी उपस्थित नव्हते तसेच हे काम रात्रीच्या वेळेस का केले जात होते याचे हि उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावे. संबंधित कामाची वर्क ऑर्डरची मागणी केली असता त्यांनी देण्यास नकार दिला त्यामुळे रीतसर काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही.
पाईप लाइन साठी आमचा आक्षेप नाही पण रस्त्या पासून काही अंतरावर होत असलेल्या नवाबाग बीच वर बंधाऱ्याचे काम सुरू आहे तेथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये - जा सुरू आहे त्यामुळे सिमेंटीकरण रस्ता फार काळ टिकणार नाही त्यामुळे रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी माजी जी.प.सदस्य दादा कुबल, भाजपा जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चा विधानसभा प्रमुख हितेश धुरी, उभादांडा शक्तीकेंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, माजी सरपंच देवेंद्र डीचोलकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

konkansamwad 
