आंबा व काजू फळपीक विमा योजनेस वाढीव मुदत. देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन.

आंबा व काजू फळपीक विमा योजनेस वाढीव मुदत.   देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन.

देवगड.

   आंबा व काजू फळपीकांसाठी शेतकऱ्यांना  फळ पीकविमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल दि. 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू राहणार आहे. कोकणातील आंबा व काजू या पिकांसाठी फळपिक विमा योजनेत भाग घेण्याची  अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 होती. त्यामुळे पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे फळपीक विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले होते. त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन दि. 4 व 5 डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त दिवस पिक विमा पोर्टल आंबा व काजू या फळपिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे. 
    तरी देवगड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवगड तालुका कृषि अधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांना केली आहे.