व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलची विद्यार्थिनी निकिता गवळी जिल्ह्यात अव्वल

व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलची विद्यार्थिनी निकिता गवळी जिल्ह्यात अव्वल


 

सावंतवाडी

 

      महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाचा निकाल 100% लागला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कामगिरी करत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

 

प्रथम वर्षाचा निकाल खालीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक – कु. निकिता गवळी (८२.५०%)
द्वितीय क्रमांक – कु. सिद्धी गोसावी (८१. २०%)
त्रितिय क्रमांक – कु. प्राची हनपडे (८०.%)

द्वितीय वर्षाचा निकाल खालीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक कु. संजना संजय मेस्त्री (८३. १८%)
द्वितीय क्रमांक कु. नेहा सुंदर गावकर (८३%), तर
तृतीय क्रमांक कु. प्रतिक्षा केशव शिंदे (८२.१८%)

      
       प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.निकिता गवळी हिने (८२.५०%) गुण पटकावत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा जिल्ह्यात अधिकच मजबूत झाला असून व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, मडखोलने आपल्या शैक्षणिक गुणवत्ता व शिस्तबद्धतेमुळे सावंतवाडी तालुक्यात आपले स्थान अधिक बळकट केले आहे.