मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

वेंगुर्ला
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.शिल्पा चव्हाण यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला "गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर" हे सुमधुर गायन करून सर्व गुरूंना 'गुरूवंदना' दिली. यानंतर गुरूंचे आपल्या आयुष्यातील स्थान व महत्त्व याविषयी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ.शिल्पा चव्हाण यांनी केले व सर्वांचे आभार मानले.