महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची


 

दिल्ली


 

 शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी सक्तीची करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश राज्यपाल भवनातून सर्वच विद्यापीठांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी ते महाविद्यालयांना देखील पाठवले आहे. विद्यार्थी गैरहजर राहत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचा शिक्षणतज्ज्ञांची मते होती. त्यामुळे वर्षभरापूर्वी नवीन धोरणासाठी नियुक्त केलेल्या मसुदा समितीसमोरदेखील ठेवण्यात आला होता. समितीने विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीबाबतचा नियम प्रस्तावित केला होता.