कृषीदूतांकडून अणाव-हूमरमाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

कृषीदूतांकडून अणाव-हूमरमाळा येथे  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

 

कुडाळ

 

         कुडाळ तालुक्यातील अणाव-हूमरमाळा येथील प्राथमिक शाळेत मुख्यध्यापिका रेश्मा सरंगले यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण सरपंच समीर पालव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सौ. सरंगले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, ओरोसचे प्राचार्य भेंडे, ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर, प्रा. गोपाल गायकी, प्रा.भावना पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  कृषीदूत गोविंद राऊळ, अथर्व परब, सिद्धेश मदने, शुभम नाईक, अंकुश शेळके, ओंकार नाईक यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. तसेच देशभक्तीपर घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला गावचे सरपंच समीर पालव, शाळेच्या मुख्यध्यापिका रेश्मा सरंगले, गावातील ग्रामस्थ, ग्रा.पं सदस्य उपस्थित होते.