जिल्हा परिषद आरक्षणावर हरकती व सूचना मागविल्या

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा प्रारूप आरक्षण मसुदा जाहीर करण्यात आला आहे. या मसुद्यावर हरकती व सूचना 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत जिल्हाधिकारी किंवा तहसिलदार कार्यालयात सादर करता येणार आहेत. मुदत संपल्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती प्र. उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली.