शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपसरपंचांचा तत्पर प्रतिसाद......न्हावेलीत पिक नुकसानीची पाहणी सुरू

न्हावेली
न्हावेली गावात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने पिके आडवी पडून कोंब फुटल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.
ही बाब समजताच ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी तात्काळ प्रतिसाद देत तलाठी कोमल धांदे आणि कृषी अधिकारी प्रियांका सावंत यांच्यासह शेतबांधावर भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना आपत्ती अनुदान मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
या वेळी शेतकरी प्रकाश धाऊस्कर, तुकाराम पार्सेकर आणि ग्रामपंचायत सदस्या आरती माळकर उपस्थित होत्या. शेतकऱ्यांनी वेळेवर नुकसानभरपाई आणि पुढील हंगामासाठी मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.