आरवली श्री देव वेतोबाचा वार्षिक वाढदिवस सोहळा १२ मे रोजी; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

आरवली श्री देव वेतोबाचा वार्षिक वाढदिवस सोहळा  १२ मे रोजी; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

वेंगुर्ला.

    तालुक्यातील आरवली येथे श्री देव वेतोबा वाढदिवस सोहळा प्रति वर्षाप्रमाणे चालू वर्षीही मिती वैशाख शुद्ध पंचमी शके 1946 रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक 8 मे पासून बुधवार दिनांक 15 मे  पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
   यामध्ये बुधवार दिनांक 8 मे रोजी सायंकाळी 6 वाजता राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा, गुरुवार दिनांक 9 मे रोजी रात्री 8 ते 9 वाजता  श्रींची पालखी प्रदक्षिणा व रात्री 9 वाजता स्वराभिषेक अभिषेक काळे ( सांगली) यांची अभंग नाट्यगीत भावगीतांची सदाबहार मैफिल, शुक्रवार दिनांक 10 मे रोजी रात्री 8 ते 9 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा व रात्री 9 वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड यांचा दणदणीत नाट्य प्रयोग, शनिवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8 पासून धार्मिक विधी , रात्री 8 ते 9 धार्मिक श्रींची पालखी प्रदक्षिणा,  रात्री 9 वाजता कलानिलयम ढवळी फोंडा गोवा प्रस्तुत पदन्यास भरतनाट्यम नृत्याविष्कार, रविवार दिनांक 12 मे रोजी सकाळी 8 पासून धार्मिक कार्यक्रम पूर्णाहुती बलिदान, दुपारी 12:30 वाजता महानैवेद्य महाआरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, रात्री 8 ते 9 वाजता  श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री 10.30 वाजता श्री देव गिरोबा नाट्य मंडळ आरोस प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती वि .वा शिरवाडकर लिखित व प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित तीन अंकी नाटक नटसम्राट, सोमवार दिनांक 13 मे रोजी रात्री 8 ते 9 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री 9 वाजता श्री रामेश्वर बाल दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा दशावतारी नाट्य प्रयोग, मंगळवार दिनांक 14 मे रोजी रात्री 8 ते 9 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री 9 वाजता श्रींची इच्छा नाट्य मंडळ तेंडोली प्रस्तुत वि .वा शिरवाडकर लिखित संगीत तीन अंकी पौराणिक बोधप्रत नाट्यपुष्प संगीत ययाती आणि देवयानी व बुधवार दिनांक 15 मे रोजी रात्री 8 ते 9 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री 9 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड यांचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोग संपन्न होणार आहे.
    श्री देव वेतोबाच्या वाढदिवसा प्रित्यर्थ होणाऱ्या वरील सर्व कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व श्रींचे आशीर्वाद घ्यावेत असे श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली व गावकर मानकरी आरवली ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.