वेंगुर्ला येथे विविध सामाजिक उपक्रमांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा.

वेंगुर्ला येथे विविध सामाजिक उपक्रमांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा.
वेंगुर्ला येथे विविध सामाजिक उपक्रमांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा.
वेंगुर्ला येथे विविध सामाजिक उपक्रमांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा.

वेंगुर्ला.

  शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेना व दीपकभाई मित्र मंडळ यांच्या वतीने वेंगुर्ला येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
  यावेळी सकाळी वेंगुर्ला भाजी मार्केटमधील हनुमान मंदिर येथे लघुरुद्र करण्यात आला.यावेळी आमदार दीपक केसरकर यांना दीर्घायुष्य लाभावे व पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार म्हणून निवडून यावेत यासाठी साकडे घालण्यात आले.यावेळी तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   यानंतर वेंगुर्ला हायस्कूल जवळील मैदानावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेना व दीपकभाई मित्र मंडळ यांच्या वतीने व जय मानसीश्वर संघ वेंगुर्ला व उभादांडा मित्र मंडळाने हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
   यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील डुबळे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, महिला शहर संघटिका मनाली परब, शबाना शेख, कार्मीस आल्मेडा, उभादांडा ग्रा.प. सदस्य राधाकृष्ण पेडणेकर, परबवाडा ग्रा.प. सदस्य हेमंत गावडे, राजू परब, प्रीतम सावंत, यशवंत किनळेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यांसह गोवा राज्यातील संघ सहभागी झाले होते.
  यानंतर प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.यावेळी वेंगुर्ला येथील शाळा नंबर ४ मध्ये औषधी गुणधर्म असलेल्या शेवगा झाडाची यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयेत व जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर जिल्हा संघटक सुनील डुबळे व शहर प्रमुख उमेश यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.तसेच रोपे विद्यार्थ्यांना देण्यात आली व शाळेच्या परिसरात शेवगा झाडाची रोपे लावण्यात आली. 
    यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, किरण कुबल, राजू परब, अमृत पोतनिस, अमर जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.