संविधानिक हितकारिणी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार

संविधानिक हितकारिणी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार

 

कणकवली

 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघातर्फे नागरी सत्कार होणार आहे.हा निर्णय वंचित समाजासाठी अभिमानाचा ठरल्याचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे “वंचित समाजाला लागलेला डाग पुसला गेला,” असे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे