कणकवली महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी.

कणकवली महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी.

कणकवली.

  शिक्षण प्रसारक मंडळाचे, कणकवली कॉलेज कणकवली येथील सांस्कृतिक विभाग व ज्युनियर एन.सी.सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विचार मंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डॉ राजश्री साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा युवराज महालिंगे, प्रमुख अतिथी प्रा.डॉ. राजेंद्रकुमार मुंबरकर,प्रा.सीमा हडकर ,पर्यवेक्षक प्रा.एस.पी.चव्हाण, प्रा.विजय सावंत ,प्रा.हरीभाऊ भिसे उपस्थित होते.
   आधुनिक युगात वावरत असताना लोकमान्य टिळक व साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यासारख्या महामानवांचे विचार गरजेचे आहेत. विद्यार्थी दशेपासून देश प्रेमाबद्दलची जागरूकता निर्माण झाली पाहिजे. विचारांची प्रगल्भता वाढवता आली पाहिजे.
   इतिहासाचा विसर पडू नये यासाठी महाविद्यालयातून अशा महामानवांचे विचार देणारे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत असे प्रतिपादन प्रा डॉ राजश्री साळुंखे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा राजेंद्रकुमार मुंबरकर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कथा कादंबऱ्यातून शौर्य पराक्रमाचे चित्रण दिसते तसेच त्यांचे स्त्री पात्र हे मानी व करारी असल्याचे दिसून येते. साहित्यरुपी विचार पेरणारा लेखक म्हणून अण्णा भाऊ साठे यांच्याकडे पाहिले जाते त्यांचे विचार समाजाला नक्कीच प्रेरक ठरणारे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा सीमा हडकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्य व साहित्य लेखनावर प्रकाश टाकला.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून सांगितले. तसेच लोकमान्य टिळकांचे विचार अंगी बनविले पाहिजेत असे मत व्यक्त केले. प्रा.एम पी.चव्हाण यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.युवराज महालिंगे यांनी ही लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच 'माझी मैना गावाकडे राहिली' अण्णाभाऊ साठे यांची छक्कड प्रा.हरिभाऊ भिसे व त्यांचे सहकारी यांनी गायली सादर केली.तसेच दिक्षिता लाड,नमिता पाटील,रिया भोगले व बुशरा बागवान या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मीनाक्षी सावंत, प्रास्ताविक प्रा.डॉ.मारोती चव्हाण तर आभार प्रदर्शन प्रा. दीपा तेंडोलकर यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.