'एक समृद्ध लोककला दशावतार' चे ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशन

'एक समृद्ध लोककला दशावतार' चे ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशन

वेंगुर्ला 

        खानोली गावचे सुपुत्र तथा दशावताराचे गाढे अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर यांच्या 'एक समृद्ध लोककला दशावतार या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ९ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.लोककला संशोधक डॉ. अशोक भाईडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, शिक्षक भारती महाराष्ट्रचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, 'तरुण भारत संवाद' सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, संतोष वायंगणकर, शिवप्रसाद देसाई आणि पुरस्कारप्राप्त कलादान ज्येष्ठ दशावतारी कलावंत यशवंत तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दशावतार' या लोककलेची परंपरा, इतिहास, वैशिष्ट्ये दशावतार लोककलेची व माहिती सांगणारे आणि जवळपास सर्व कलावंत, वादक यांची नावे असणारे हे दशावतारावरील पहिले पुस्तक आहे. श्लोक क्रिएशन मुंबई व 'डिंपल पब्लिकेशन मुंबईतर्फे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. कुडाळ येथील श्याम आर्टसचे महेंद्र जुवलेकर यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ केले आहे. या सोहळ्यास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन लेखक प्रा. वैभव खानोलकर यांनी केले आहे.