वेंगुर्ले ग्राहक पंचायत अध्यक्षपदी आनंद बांदेकर

वेंगुर्ला
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वेंगुर्ला तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून डॉ. आनंद प्रभाकर बांदेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वेंगुर्ला - रामघाट येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, संघटक विष्णुप्रसाद दळवी, महिला सहसंघटिका श्रीम. रीमा भोसले, सहसचिव श्रीम. सुगंधा देवरुखकर, कोषाध्यक्ष संजय पाटील आणि सल्लागार अॅड. समीर वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.उपाध्यक्ष सीताराम कुडतरकर यांनी ग्राहक चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. त्यांनी ही जनचळवळ व्हावी, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची रचना, कार्यपद्धती आणि तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावर सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. या बैठकीला प्रा. डॉ. आनंद बांदेकर, प्रा. डॉ. सचिन परुळकर, प्रा. डॉ. गोविंद धुरी, श्रीम. अंकिता बांदेकर, श्रीम. मंजुषा आरोलकर, सुनील रेडकर, नामदेव सरमळकर, महेश राऊळ, महेंद्र घाडी, विकास वैद्य, हेमंत गावडे, संजय पिळणकर, राजन भोसले, रोहन भोग आणि सावंतवाडी तालुका अध्यक्ष अमोल केसरकर आदी उपस्थित होते.यात अध्यक्षपदी डॉ. आनंद बांदेकर, सचिवपदी सुनील रेडकर, उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. सचिन परुळकर, तालुका संघटकपदी महेश राऊळ, सहसंघटकपदी महेंद्र घाडी, सहसंघटक महिलापदी श्रीम. मंजुषा आरोलकर, सहसचिवपदी हेमंत गावडे, कोषाध्यक्षपदी प्रा. डॉ. गोविंद धुरी, प्रसिद्धी प्रमुखपदी संजय पिळणकर, सल्लागारपदी डॉ. संजीव लिंगवत, सदस्यपदी श्रीम. अंकिता बांदेकर आदींची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर श्री. बांदेकर यांनी ग्राहक चळवळ आणि ग्राहक जागृती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच, सर्वांना सोबत घेऊन संस्थेने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.