पाटकर हायस्कूल येथे राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा.

पाटकर हायस्कूल येथे राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा.

वेंगुर्ला.

   येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेज वेंगुर्ला येथे प्राचार्य श्री.सोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली व हिंदी शिक्षिका श्रीमती मांजरेकर उज्जयनी यांच्या नियोजनातून राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात संपन्न झाला.
   याप्रसंगी शिक्षकांना सम्मानित करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर विज्ञान शिक्षिका श्रीमती सविता जाधव, सौ मनिषा खरात, सौ.स्वप्नाली पिळणकर, विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ मालंडकर उपस्थित होते.
   यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत,भाषण व कविता वाचनातून व्यक्त केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीं हिंदी समुहगीते सादर केली. तसेच हिंदी शिक्षिका श्रीमती मांजरेकर यांनी हिंदी दिन व हिंदी विषयाचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सविता जाधव यांनी केले.