आफताब शेख आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा......सकल हिंदू समाजाची बांदा पोलिसांकडे मागणी

आफताब शेख आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा......सकल हिंदू समाजाची बांदा पोलिसांकडे मागणी

 

बांदा
 

   बांदा येथील व्यापारी आफताब शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात काही व्यक्तींकडून दिशाभूल सुरू आहे. हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबवाव्यात, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून बांदा पोलिसांकडे करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने नेमकी आत्महत्या का केली? त्यामागचे कारण काय? याचा सखोल अभ्यास करण्यात यावा तसेच आत्महत्या करण्यापूर्वी संबंधिताने केलेला व्हिडिओ नेमका कोणी रेकॉर्ड केला? याची माहिती घ्यावी आणि त्यानंतर पुढील तपास करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबत बांदा येथील नागरिक व सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.
     यावेळी शामकांत काणेकर, लवू महाडेश्वर, आनंद प्रभू, डॉ. पंकज दिघे, स्वागत नाटेकर, शितल राऊळ, कृष्णा धुळपनवर, सुधीर राऊळ, मंदार कल्याणकर, आशिष कल्याणकर, साई कल्याणकर, मनोज कल्याणकर, सौरभ आगलावे, नंदू केळुस्कर, संदेश पटेकर, सागर सावंत, सखाराम देसाई, गौरी कल्याणकर, नंदू कल्याणकर, केदार कणबर्गी, सोमकांत नानोस्कर, शैलेश केसरकर, वीरेंद्र आठलेकर, सर्वेश मुळ्ये, गुरुनाथ साळगावकर, कुणाल वरसकर, तन्वी काणेकर, प्रिया नाटेकर आदींसह हिंदू बांधव उपस्थित होते.