वेंगुर्ला बाजारपेठेत सर्व अस्थापनांवर आणि दुकानांवर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत. मनसेची मागणी; वेंगुर्ला मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
वेंगुर्ला.
वेंगुर्ला बाजारपेठेत सर्व अस्थापनांवर आणि दुकानांवर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत मनसेची मागणी
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व अस्थापनांवर मराठी पाट्या सक्तीच्या असुनही वेंगुर्ल्यातील बऱ्याच अस्थापनांवर व दुकानांवर इंग्रजी पाट्या सर्रास दिसतात ह्या आशयाचे निवेदन मनसे वेंगुर्ला तर्फे मुख्याधिकारी वेंगुर्ला नगरपालिका ह्यांना देण्यात आले.सदर निवेदनात पालिकेला पाट्या बदलून घेण्यासाठी ८ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. याबद्दल बोलताना मुख्यधिकारी यांनी उद्याच लाऊडस्पीकरद्वारे पाट्या बदलून घेण्याचे आवाहन पालिकेद्वारे केले जाईल अशी ग्वाही दिली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर ह्यांच्या नेतृत्वाखाली तालूका अध्यक्ष सनी बागकर ह्यांनी वरील निवेदन मुख्याधिकारी यांना सादर केले.
यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपतालुका अध्यक्ष महादेव तांडेल, शहर अध्यक्ष सुरज मालवणकर, सौ स्नेहा कुडाळकर, सहदेव फोडनाईक, संतोष परब, प्रथमेश नाईक, प्रशांत कुडाळकर, प्रफुल्ल धुरी, विक्रम मोरजकर, प्रतीक गोरे, गौरव मराठे, तेजस वेंगुलेकर, लक्ष्मण दळवी आदी पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.