वेंगुर्ले शहरातील पॉप्युलर स्टोअर्सचे मालक मनमोहन उर्फ मन्याबापू दाभोलकर यांचे निधन

वेंगुर्ले
वेंगुर्ले शहरातील कापड व्यावसायिक आणि पॉप्युलर स्टोअर्सचे मालक, ज्येष्ठ व्यापारी मनमोहन विनायक दाभोलकर (वय ९४) यांचे आज बाजारपेठेतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते मन्या बापू या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे तसेच विवाहित मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कापड व्यापारी अमर दाभोलकर यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने वेंगुर्ला शहरात शोककळा पसरली आहे.