शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रियाज खान यांची निवड.

शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रियाज खान यांची निवड.

सावंतवाडी.

   शिवसेनेच्या (उबाठा) सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बांदा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते रियाज खान यांची निवड करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते खान यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. खान यांनी यापूर्वी सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष म्हणून संघटना वाढीसाठी भरीव काम केल्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पदोन्नती केल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. त्यांच्या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे.
   अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद बटवाले यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना संघटना वाढीसाठी वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे यावेळी खान यांनी सांगितले.