कसाल येथे पांढरी काठीदिन उत्साहात साजरा.

कसाल येथे पांढरी काठीदिन उत्साहात साजरा.

 

ओरोस
   सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने 15ऑक्टोबर रोजी कसाल सिद्धिविनायक मंदिर येथे पांढरी काठीदिन मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी पन्नास हून अधिक दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, हरेश वेंगुर्लेकर, विजय कदम, राजेंद्र मेस्त्री, प्रणाली दळवी, संजना गावडे, जयश्री मेजारी, प्रशांत केळुस्कर आदि मान्यवर उपस्थित होते. 
    पांढऱ्या काठीचे महत्त्व अनिल शिंगाडे सर यांनी सांगितले व पांढऱ्या कठीचे महत्त्व व लेख संजना गावडे यांनी सांगितला. पांढऱ्या काठीला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गरजू अंध बांधव व भगिनी यांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात आले. राजेंद्र मेस्त्री यांनी अपंग बांधवांना मार्गदर्शन केले. तर प्रणाली दळवी यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमांची सांगता केली.