महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

 

म्हापण

 

         शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार, म्हापण जिल्हा परिषदेसाठी सौ. यज्ञा देवदत्त साळगावकर आणि परुळे पंचायत समितीसाठी श्री. सचिन दामोदर देसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री. पपू परब आणि शिवसेना नेते श्री. सचिन वालावलकर प्रमुख उपस्थित होते. श्री देव वेतोबा आणि श्री देव आदिनारायण यांना श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी म्हापण जिल्हा परिषद आणि परुळे पंचायत समितीच्या महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या उपस्थितीतून महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा पाठिंबा आणि समर्थन दिसून आले.यावेळी पपू परब आणि सचिन वालावलकर यांनी महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच पाठबळ यामुळे  महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक बळावली आहे.