दोडामार्ग येथील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश दळवी यांचे निधन

दोडामार्ग येथील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश दळवी यांचे निधन

 

दोडामार्ग

 

       दोडामार्ग तालुक्यातील बोडदे टेंबवाडी मधील रमेश अर्जुन दळवी यांचे सोमवारी रात्री दुखद निधन झाले. श्री. दळवी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद भूषविले होते. तसेच माजी सैनिक बँकेचे चेअरमन म्हणून देखील काम केले होते. त्याशिवाय सध्या ते भाजप मध्ये ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून काम करत होते. तालुक्यात ते आबाजी या नावाने परिचित होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना , दोन विवाहित मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.