मी नेता नाही सेवक | सामाजिक कार्यात सदैव तुमच्यासोबत असेन विशाल परब यांचे वेंगुर्ला येथील एका सामाजिक कार्यक्रम प्रतिपादन.

मी नेता नाही सेवक | सामाजिक कार्यात सदैव तुमच्यासोबत असेन  विशाल परब यांचे वेंगुर्ला येथील एका सामाजिक कार्यक्रम प्रतिपादन.


वेंगुर्ला 
    भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसाच्या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेला आज दुपारी भेट देत शहरातील डासांच्या प्रतिबंधासाठी पालिकेला ३ फोगिंग मशीन व स्वछता कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी लागणारे मोठे कंटेनर भेट म्हणुन दिले. या सर्व वस्तू त्यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेला सुपूर्त केल्या. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाल्याने याचा दुखवटा पाळत आपला वाढदिवस थाटात न साजरा करता विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे विशाल परब यांनी ठरवले. 
               मी नेता नाही सेवक आहे, सामाजिक कार्यात मी सदैव तुमच्या सोबत असेन असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले. वेंगुर्ला नगरपरिषद चे नाव देशात झळकवण्यासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या सहित मुख्याधिकारी, सर्व अधिकारी, स्वछता कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही अडचण असल्यास तुम्ही मला केव्हाही हाक द्या. हा सर्व परिसर सुसज्ज राहिला पाहिजे यासाठी आशा प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम दरवर्षी आम्ही राबवणार आहोत. वेंगुर्ला मधील पदाधिकारी यांची शववहिनीची मागणी होती. चांगल्या प्रकारची शववाहिनी आम्ही मागवली आहे. आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही ती प्रदान करू असे आश्वासनही विशाल परब यांनी यावेळी दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, महिला मोर्चाच्या सुषमा प्रभूखानोलकर यांनी विशाल परब याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले. यावेळी साईप्रसाद नाईक, दादा केळुसकर, भालेकर, अभिषेक वेंगुर्लेकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, प्रणव वायंगणकर, वैभव होडावडेकर, प्रितम सावंत, हेमंत गावडे, मनोज उगवेकर, शिरसाट, महादेव गावडे  यांच्यासाहित भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.