सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कराटेपटूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका
मुंबई
मुलुंड, मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वेळकर कराटे-डो अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.ही स्पर्धा वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन मार्फत आयोजित करण्यात आली होती व या स्पर्धेत १३ देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता.या स्पर्धेत शाळा गजानन विद्यालय पाट चे हर्षदा गणेश जोशी व राजदत्त गिरीप्रसाद राऊळ, नेरुळ माडयाची वाडी प्राथमिक शाळेतील संस्कृती संतोष परब, अण्णासाहेब देसाई विद्यालय, परुळे येथील तौफिक इम्तियाज अंसारी या सर्व विद्यार्थ्यांनी काता व कुमीते या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकांची कमाई केली व दिक्षा नागेश बुट्टे हिने काता प्रकारात सुवर्ण व कुमीते प्रकारात कांस्य पदक मिळवले.त्याच सोबत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक श्री. महादेव धोंडू वेळकर यांनी सुद्धा काता व कुमीते दोन्ही प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक यांनी मिळून भारत देशासाठी ११ सुवर्ण व १ कांस्य असे एकूण १२ पदकांची कमाई केली आहे.सर्व विद्यार्थी व प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

konkansamwad 
