रघुवीर मेडिकल स्टोअर्स वेंगुर्लेचे व्यवस्थापक विवेक उर्फ विभा खानोलकर यांचे निधन
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा वेंगुर्ला बाजारपेठेमधील मे. रघुवीर मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे व्यवस्थापक विवेक उर्फ विभा खानोलकर (63) यांचे आज (दि.7 फेब्रुवारी) शनिवारी पहाटेच्या सुमारास गोवा-मणिपाल येथील रूग्णालयात ह्रदय विकाराच्या आजारावर उपचार सुरू असताना आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वेंगुर्ले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. व्यापारी वर्गाने त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताबडतोब वेंगुर्ले शहरातील विविध दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.गेली 30 वर्षे मेडिकल क्षेत्रातील अनुभवी तसेच जाणकार औषध व्रिकेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वेंगुर्ला बाजारपेठेतील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. हसरा चेहरा, लोकांशी आपुलकी, बोलण्यात आदर अशी त्यांची ओळख होती.खानोलकर यांच्या जाण्याने संपूर्ण वेंगुर्ल्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, भाऊ, बहिणी, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

konkansamwad 
