मुंबई-गोवा महामार्गावर कारच्या धडकेत महिला जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर कारच्या धडकेत महिला जागीच ठार

 

कुडाळ

 

      मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव येणाऱ्या कारने धडक दिल्याने पादचारी महिला जागीच ठार झाली. आशा सोनू धुरी (वय ६५, रा. पिंगुळी-धुरीटेंबनगर) असे तिचे नाव आहे. हि घटना पिंगुळी-मोरजकरवाडी येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून दोडामार्ग-सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती सुझुकी एक्स.एल.६ कारने पादचारी आशा धुरी यांना जोराची धडक दिली. वेग इतका जास्त होता की धडक दिल्यानंतर ही कार साधारण ३५ ते ४० मीटर अंतरावर जाऊन थांबली. अपघाताची माहिती मिळताच पिंगुळी-धुरीटेंबनगर व मोरजकरवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेतले असून कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.