म्हापण येथे 'नमो चषक २०२४ ' स्पर्धेचे उद्घाटन.

म्हापण येथे 'नमो चषक २०२४ ' स्पर्धेचे उद्घाटन.

वेंगुर्ला.

   नमो चषक २०२४ म्हापण जि.प.मर्यादित स्पर्धेचे उदघाटन भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री पाटकर असे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात केलेली विकास कामे नवनवीन केलेल्या योजना यांचा सामन्यातल्या सामान्य नागरिकांना झालेला लाभ  विकासात्मक योजना तसेच नमो चषक याबद्दल संविस्तर विश्लेषण केले.२०२४ मध्ये ४५+ खासदार निवडून येऊन पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होतील.भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रथमेश तेली यांच्या सहकार्याने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असे प्रतिपादन श्री. पाटकर यांनी केले.
   यावेळी कोचरा गावचे माजी सरपंच आप्पी फणसेकर, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, म्हापणकर गुरुजी यांसह नागरिक, खेळाडू, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन आप्पी फणसेकर यांनी केले.