मुंबई गोवा महामार्गावर कार पलटी
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली उड्डाणपुलावर टायर फुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. यात कारमधील पाच जण सुदैवाने बचावले. आज दुपारी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. गोवा येथे आलेले पर्यटक आपल्या कारमधून महामार्गावरून मुंबई येथे जात होते. कणकवली उड्डाणपुलावर पल्लवी लॉज समोर कार आल्यानंतर कारचा टायर फुटला. यात लगतच्या संरक्षक कठड्याला आदळून कारपलटी झाली. या कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात त्यांना जास्त दुखापती झाली नाही. अपघातावेळी कारच्या दोन्ही साईडच्या एअरबॅग फुटल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस सुभाष शिवगण, महामार्ग वाहतूक पोलीस हर्षल खडपकर, योगेश लाड, दत्तात्रय राऊत आदींनी घटनास्थळी पोहचले.

konkansamwad 
