सिंधुदुर्गात भाजप पक्षश्रेष्ठींची मोठी कारवाई

सिंधुदुर्गात भाजप पक्षश्रेष्ठींची मोठी कारवाई

 

सिंधुदुर्ग

 

        सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पार्टीने कडक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज भरणे, विरोधी उमेदवाराला मदत करणे अथवा अन्य प्रकारच्या पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी एकूण २३ जणांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दि. २८ जानेवारी रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार  पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
      निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये श्री. राजन बाळकृष्ण चिके, श्री. राजेंद्र दत्ताराम महापसेकर, श्रीमती. सुजाता अजित पडवळ, श्रीमती. वंदना किरण किनळेकर, श्री. विजय महादेव रेडकर, श्री. जनार्दन रुक्मानंद कुडाळकर, श्री. डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोझा, श्री. जितेंद्र पांडुरंग गावकर, श्री. योगेश अशोक केणी, श्री. स्वागत रघुवीर नाटेकर, श्री. नितीन एकनाथ राऊळ, श्रीमती. शर्वाणी शेखर गावकर, श्री. उल्हास उत्तम परब, श्री. स्नेहल संदीप नेमळेकर, श्रीमती. साक्षी संदीप नाईक, श्रीमती. सुप्रिया शैलेश नाईक, श्रीमती. सुनीता कमलाकर भिसे, श्री. प्रविण नारायण गवस यांचा समावेश आहे.