हिंदूधर्माभिमानी वेंगुर्ला यांच्यामार्फत वेशभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धा

वेंगुर्ला
गुढीपाडवा व नववर्षाचे औचित्य साधत हिंदूधर्माभिमानी, वेंगुर्ला यांच्यामार्फत वेशभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तालुकास्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी असून दि. 30 मार्च 2025 रोजी श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे दुपारी 3:00 वाजता घेण्यात येणार आहेत. याप्रसंगी शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे स्वरूप व पारितोषिके हे पुढीलप्रमाणे असतील
◆ लहान गट- इयत्ता पहिली ते पाचवी विषय - ऐतिहासिक व संत परंपरा
प्रथम क्रमांक- रोख रक्कम 700, चषक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक रोख रक्कम 500, चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक - रोख रक्कम 300, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ क्रमांक- रोख रक्कम 200, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ क्रमांक- रोख रक्कम 200, चषक व प्रमाणपत्र
◆ मोठा गट - इयत्ता सहावी ते दहावी विषय - रामायण व महाभारतामधील व्यक्तिरेखा
प्रथम क्रमांक - रोख रक्कम 1000, चषक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक रोख रक्कम 700, चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक- रोख रक्कम 500, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ क्रमांक- रोख रक्कम 300, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ क्रमांक- रोख रक्कम 300, चषक व प्रमाणपत्र
या स्पर्धेची एक विशिष्ट नियमावली असून त्यात पुढील बाबींचा समावेश आहे.
1) नोंदणीची अंतिम तारीख 28 मार्च 2025 पर्यंत राहील.
2) दोन्ही गटांसाठी सादरीकरण कालावधी कमाल 2 मिनिटे राहिल.
3) स्पर्धकांनी येताना शाळेचे ओळखपत्र कार्यक्रमस्थळी घेऊन येणे अनिवार्य आहे.
4) मोठ्या गटातील स्पर्धकांनी दुपारी ठीक 2:50 वा. व लहान गटातील स्पर्धकांनी दुपारी ठीक 3:30 वा. स्पर्धेसाठी रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे उपस्थित रहावे.
5) सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राने गौरविण्यात येईल.
तरी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विनीत परब - 8956694853 किंवा डॉ. सचिन परुळकर -
9421238053 यांच्याशी संपर्क साधावा.