सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे 2025-26 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये प्रेस क्लब भुषण पुरस्कार दैनिक कोकणसादचे सिंधुदुर्ग उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना जाहीर करण्यात आला आहे. तर प्रेस क्लबचा डिजिटल मिडिया पुरस्कार शैलेश मयेकर यांना जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांना जीवन गौरव पुरस्कार
प्रेस क्लब जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना दिलेला न्याय आणि अन्याया विरोधात केलेला प्रतिकार यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण पत्रकार पुरस्कार सुनिल आचरेकर यांना
प्रेस क्लब ग्रामीण पत्रकार पुरस्कार कसाल येथील सुनिल गणपत आचरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी पुढारी सारख्या वृत्तपत्रात तसेच सोशल मीडियातही कार्यरत आहेत.
कर्मचारी पुरस्कार संदेश पाटील यांना
कर्मचारी पुरस्कार लोकमतचे संदेश पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. ते गेली अनेक वर्ष लोकमत वृत्तपत्रात जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारीत
या पुरस्कारांचे वितरण दिमाखदार सोहळ्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष अनंत जाधव, सचिव राकेश परब यांच्यासह सदस्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

konkansamwad 
