सतीश सावंत आज भाजपचे कमळ हाती घेणार

सतीश सावंत आज भाजपचे कमळ हाती घेणार

 

कणकवली

 

       आज १ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केले होते. सावंत कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेले, पण अलीकडेच पालकमंत्री नितेश राणे व सतीश सावंत एकत्र दिसले त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे चित्र दिसत होते अखेर आज मंत्री राणे यांच्या उपस्थितीत सावंत भाजपाचे कमळ हाती घेणार असून हा पक्ष प्रवेश कणकवली हरकूळ बु. ग्रामपंचायत समोरील कोकण रिट्रीट हॉलवर होणार आहे.