अजिंक्य गावडे यांची सिंधुदुर्ग काँग्रेस सेवादलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

अजिंक्य गावडे यांची सिंधुदुर्ग काँग्रेस सेवादलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

 

वेंगुर्ला

 

         वेंगुर्ला-शिरोडा येथील अजिंक्य धोंडू गावडे यांची काँग्रेस सेवादलच्या सिंधूदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतचे पत्र महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष विलास औताडे यांनी जारी केले.अजिंक्य गावडे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी पक्षासाठी नेहमीच आपले सर्वस्व अर्पण केले. त्यामुळे त्यांच्या या योगदानाबद्दल सेवादल काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबत काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांना पत्र देण्यात आले असून, त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.अजिंक्य गावडे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांना जिल्ह्यातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारी घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.