मंगेश तळवणेकर यांची खासदार नारायण राणेंकडे सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग
माजी शिक्षण व आरोग्य सभापती तसेच श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान तळवणेकर यांच्या कार्याची दखल घेत खासदार राणे यांनी, “जनतेची कामे करताना काही अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास अवश्य संपर्क साधा,”असे आश्वासन दिले.
राणे यांनी पुढील कार्यासाठी तळवणेकर यांना शुभेच्छाही दिल्या.या आत्मीयतेबद्दल तळवणेकर यांनी खासदार राणेंचे मनःपूर्वक आभार मानले. या भेटीवेळी लक्ष्मण देऊलकर, रामकृष्ण परब, नारायण कारीवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.