रामेश्वर देवस्थान तळी व परिसर पर्यटनदृष्टया विकसित करणे कामाचा भूमीपूजन सोहळा संपन्न.
वेंगुर्ला.
श्री रामेश्वर या प्राचीन धार्मिक स्थळाचे सुशोभिकरण करण्याच्या हेतूने वेंगुर्ला नगपरिषदेमार्फत रामेश्वर देवस्थान तळी व परिसर पर्यटनदृष्टया विकसित करण्यात येणार आहे. या कामाच्या पहिला टप्पासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पर्यटन अनुदान योजनेमधून ५० लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे.
या कामाचा भूमीपूजन समारंभ सोमवार दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने रामेश्वर मंदीर परिसरात संपन्न झाला.
या प्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, वास्तुविशारद अमित कामत, सचिन वालावलकर, संजय आंग्रे, सुनिल डुबळे, उमेश येरम, नितीन मांजरेकर, सुहास गवंडळकर, देवस्थान समितीचे दाजी परब व इतर मानकरी तसेच वेंगुर्ल्यातील विविध पदाधिकारी व शहरातील नागरीक उपस्थित होते.