परुळे विद्यामंदिरचा अतीश सामंत जिल्ह्यात पहिला

वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेचा विद्यार्थी कु. अतीश अमेय सामंत (इयत्ता सहावी) याने "नवनीत युवा मास्टर स्ट्रोक ऑल इंडिया ड्रॉइंग कॉम्पिटिशन" या चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.या स्पर्धेत अतीश अमेय सामंत या विद्यार्थ्याने ब गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नवनीत युवा यांच्याकडून प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल अतीश, त्याचे पालक व मार्गदर्शक शिक्षक रोशन परब सर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.