वादळाच्या पार्श्वभूमीवर मालवण किनारपट्टीत चेतावणी

मालवण
वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर समुद्रात झालेल्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. ‘शक्ती’ वादळामुळे बंदर विभागाने दोन नंबरचा धोक्याचा बावटा लावला असून, पोलिसांनी किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांना तातडीच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी बंदर जेटी, दांडी, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांसोबत तातडीची बैठक घेऊन सर्व साहसी जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस प्रशासनाचे आवाहन
- वेळागरसारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.
- सर्व मार्गदर्शक सूचना व नियम काटेकोरपणे पाळावे.
- पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे!