सावंतवाडीत काँग्रेसला नवा उत्साह; निषाद बुरान यांची निवड

सावंतवाडी
सावंतवाडी शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निषाद बुरान यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. याप्रसंगी शेख यांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवक संघटना अधिक बळकट करण्याचे आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विलास गावडे, ॲड. दिलीप नार्वेकर, शहर अध्यक्ष राघू नार्वेकर, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, युवा शहर अध्यक्ष बासित पाडवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.निषाद बुरान यांच्या निवडीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.