मदर तेरेसा स्कूल येथे स्काऊट गाईड शिबिर संपन्न.
वेंगुर्ला.
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे शालेयस्तरावर दोन दिवशीय स्काऊट गाईड शिबिराचे दि.२ व ३ मार्च रोजी आयोजन मुलांसाठी करण्यात आले.या कॅम्पचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी मुलांना स्काऊट गाईड विषयी माहिती देताना स्वामी विवेकानंदांचे सुंदर उदाहरण देऊन उत्तम असे मार्गदर्शन केले.स्काऊट गाईड मुळे मानवी गुणांच्या विकासासोबत संस्कारित नागरिक बनून समाज व राष्ट्रासाठी उपयोग होतो. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी मुलांना या कॅम्पविषयी थोडक्यात माहिती दिली.जे दिवसभर व रात्री कार्यक्रम तसेच उपक्रम करण्यात येणार आहेत याची माहिती ही अंकित सोन्सुरकर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्लॅनिस पिंटो यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन अंकित सोन्सुरकर, निधी तांडेल यांनी केले.