महिलांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन काम केल्यास विकास दूर नाही : काका कुडाळकर. वेंगुर्ला येथे महिला स्वयंरोजगार मेळावा संपन्न.

वेंगुर्ला.
शासन स्तरावर आज महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्यामध्ये बहुसंख्य योजना समाविष्ट आहेत.सिंधुरत्न तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनेक योजना आहेत.आज महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येत उद्योग करणे महत्वाचे आहे. आज महिलांनी पुढे येऊन व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन काम केल्यास विकास दूर नाही असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी वेंगुर्ला येथे आयोजित महिला स्वयंरोजगार मेळाव्यात बोलताना केले.
वेंगुर्ला काथ्या औद्योजिक संस्था येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सोमवारी महिला स्वयंरोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कुडाळकर बोलत होते.व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव एम.के.गावडे, महिला काथ्या औद्योगिक संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, योगिनी दामले, जिल्हा उद्योग केंद्राच्या योगिता, शामसुंदर राय, शहराध्यक्ष सुरज परब, शहर उपाध्यक्ष स्वप्निल परब, वेंगुर्ला महिला तालुकाध्यक्ष आरती सातार्डेकर, कणकवली तालुकाध्यक्ष रिया भांबुरे, कुडाळ तालुकाध्यक्ष पूजा पेडणेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रिद्धी परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष ऐश्वर्या कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया धुरी, सुभाष दळवी, संतोष राऊळ, सचिन कोंडये, शशिकांत गावडे, सुभाष तांडेल, सॅमसंग फर्नांडिस आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते, महिला बहुसंख्येने उपस्थित होते. महिलांच्या सहभाग शिवाय भारत देश आर्थिक महासत्ता होऊ शकत नाही.त्यामुळे प्रत्येक महिलेने औद्योगिक क्षेत्रामध्ये योगदान देणे काळाची गरज आहे, असे यावेळी बोलताना एम.के.गावडे म्हणाले. यावेळी पर्यटन संस्था अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुशील चमणकर, महिला उद्योजिका विजया गावडे, कृषी सेल तालुकाध्यक्ष तुषार राय इत्यादींचा काका कुडाळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा उद्योग केंद्रामार्फत योगिता यांनी विविध योजनांची माहिती दिली.राजमाता जिजाबाई व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रज्ञा परब यांनी मानले.