अल्पसंख्याक शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

अल्पसंख्याक शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

  राज्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावरुन अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.
   यायोजनेचा लाभ घेण्यास अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळा/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये किमान 70 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बोद्ध, पारसी, जैन) शिक्षण घेत आहेत तसेच अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारसी, जैन) शिक्षण घेत आहेत अशा शाळा/संस्था पात्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली.
   जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि. 12 मार्च 2024 पर्यंत सादर करावेत असे आवाहन  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
  विहित अर्जाचा नमुना, अधिक तपशीलसाठी अल्पसंख्यांक विकास विभागाचे शासन निर्णय दि. ०७/१०/२०१५ मध्ये उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.