भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी दिली 'इस्त्रोला' भेट.
सावंतवाडी.
येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच इस्त्रोच्या बेंगलोर येथील यू.आर.राव सॅटेलाइट सेंटरला भेट दिली. कॉलेजच्या इंडस्ट्रियल व्हिजिट उपक्रमांतर्गत पाच ते दहा फेब्रुवारी या कालावधीत प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत कॉलेजचे ६३ विद्यार्थी व ५ शिक्षक सहभागी झाले होते.
इस्त्रोचे हे केंद्र निरनिराळे सॅटेलाइट बनविणे व त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी शास्त्रज्ञ अनुराधा दोरास्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सोबतच विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) व इन्फोसिसच्या म्हैसूर येथील कार्यालयाला भेट दिली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स ही लष्करी विमाने व संरक्षण सामग्री बनविणारी आघाडीची सरकारी कंपनी आहे. तसेच इन्फोसिस ही देशाची आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी आहे. यावेळी इन्फोसिस ऑपरेशन स्पेशालिस्ट बी.रंगा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अशा प्रकारच्या व्हिजिट्समुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम व आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालणे सोपे होते असे कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी सांगितले. या भेटीचे मुख्य समन्वयक म्हणून विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल राऊळ यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना प्रा.मनोज खाडिलकर, प्रा.प्राजक्ता राणे, प्रा.गीता पाध्ये व प्रा.अँथनी फर्नांडिस यांचे सहकार्य लाभले.