बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले.

पालघर.
पश्चिम रेल्वेवर मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेनंतर एकच रेल्वे प्रशासनाची एकच धावाधाव झाली.
पालघरमधून मोठी बातमी समोर येत असून पश्चिम रेल्वेवर मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 4 डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेनंतर एकच रेल्वे प्रशासनाची एकच धावाधाव झाली. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे डब्यातून घसरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या मालगाडीचे मागील चार डब्बे रुळावरून घसरले आहेत. या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहोचले. बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डात माल उतरवण्यासाठी मालगाडी आली होती. या अपघाताचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. बोईसर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये माल खाली करण्यासाठी आली होती माल गाडी म्हणूनच फारसा फटका लोकल वाहतूकीवर झाला नाही.