देवगड येथे नरेंद्र महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा उत्साहात संपन्न.

देवगड येथे नरेंद्र महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा उत्साहात संपन्न.

देवगड.

   देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे स्व-स्वरूप संप्रदा सिंधुदूर्गच्यावतीने जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्रार्चाजीमहाराज यांचा पादूका दर्शन सोहळा उत्साहात पार पडला.दीक्षा घेवून संन्यासी होवू नका तर दीक्षा घेवुन संसार करता करता भक्तिमार्गाचा अवलंब करून परमार्थ करा असे मौलिक मार्गदर्शन ऑनलाईन प्रवचनाद्वारे जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी देवगड येथे उपस्थित भक्तजन व उपासना घेतलेल्या दीक्षा उपासकांसमोर केले.
    सुरूवातील देवगड मांजरेकर नाका ते इंद्रप्रस्थ हॉल अशी भव्दिव्य स्वरूपाची असंख्य भक्तजन व सेवा समिती सदस्य यांच्या उपस्थितीत नरेंद्रार्चा महाराज यांच्या जयघोषात पादुका मिरवणुक काढण्यात आली.यानंतर गुरूजींच्या उपस्थितीत विधीवत पादुका पुजन, गुरूपुजन सोहळा पार पडला. कार्यक्रमामध्ये सामाजिक उपक्रमा अंतर्गत बचतगटांना फवारणी पंप व आंबा कलमे रोप वाटप करण्यात आले. आमदार नितेश राणे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, माजी जि.प.सदस्या सौ.मनस्वी घारे, आदींनी उपस्थित राहून पादुका दर्शन घेतले.ज.न.प्रवचनकार पंकज बिरादार यांचा प्रवचन सोहळा पार पडला.तसेच उपासकांना उपासक दीक्षा देण्यात आली.यानंतर उपस्थित भक्तजन आणि दीक्षा उपासक यांना जगद्गुरू नरेंद्रार्चा महाराज यांनी ऑनलाईन प्रवचनाद्वारे मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर संन्यासी बनू नका तर संसारात राहुनच भक्तिमार्गाचा अवलंब करीत परमार्थ करा असा मौलिक विचार त्यांनी यावेळी प्रवचनाद्वारे दीक्षा उपासक यांना दिला.श्रीकृष्ण हा देव होता तर त्याची आई ही मनुष् व मामा कंस हा राक्षसी प्रवृत्तीचा होता यामुळे देवही आपल्यात आहे तसेच मानव व राक्षसी प्रवृत्तीही आपल्यात आहे यातुनच मानव व देव गुण आत्मसात करून त्याला भक्तिमार्गाची जोड देवून सन्मार्गाने सर्वांची सेवा करा असे आवाहन नरेंद्रार्चा महाराज यांनी यावेळी केले.या र्काक्रमानिमित्त देवगड नगरी भक्तांनी फुलून गेली होती.