अणसूर ग्रामपंचायतमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबीर......८२ जणांना लाभ

वेंगुर्ले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अणसूर ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबिरामध्ये 82 जणांनी लाभ घेतला. याशिवाय 24 जणांनी आयुष्मान कार्ड काढून घेतले. कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरपंच सत्यविजय गावडे आणि दीपप्रज्वलन आनंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात लाभ घेणाऱ्या सर्व 82 जणांना मोफत चष्मा देखील वितरित केले गेले.
सरपंच सत्यविजय गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “हे शिबीर ग्रामस्थांना सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने आयोजित केले आहे. वर्षातून दोन ते तीन वेळा आरोग्य विषयक शिबीरे घेतली जातात आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून नवीन उपक्रम राबवून ग्रामस्थांना सुविधा पुरविण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे.”
कार्यक्रमात डॉ. गद्रे यांच्या वैद्यकीय टीमसह उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद (बिटू) गावडे, गणेश गावडे, प्रभाकर गावडे, अंगणवाडी सेविका अनिषा गावडे, मदतनीस अन्नपूर्णा गावडे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर, सीआरपी शिला देवूलकर, रुचिता गावडे उपस्थित होते.