केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पूर्वनियोजित वेंगुर्ला दौरा स्थगित. माजी आमदार राजन तेली यांचा स्टेटस चर्चेत.

वेंगुर्ला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वेंगुर्ला तालुका दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.नारायणराव राणे यांच्या पूर्वनियोजित बैठकीसाठी वेंगुर्ला भाजप कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती परंतु त्यांचा हा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वेंगुर्ला भाजप कार्यालयातून देण्यात आली.त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील सर्व प्रकारच्या उपाययोजना आणि काळजी घेतली जात होती.दौरा स्थगित होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु माजी आमदार राजन तेली यांचा स्टेटस लक्ष वेधून घेत आहे.त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातून असे म्हटले आहे की "सावंतवाडी विधान सभेतील भारतीय जनता पार्टी च्या नियोजित सभा कोणाच्या तरी हट्टामुळे २ वेळा रद्द झाल्या. कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत करुन सभेचे नियोजन केले होते. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो" अशी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु हट्ट करणारा नेमका व्यक्ती कोण असा प्रश्न आता वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पडला आहे