खर्डेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा.
वेंगुर्ला.
येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात दि.२१ जुन आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर कॅम्प मैदान बॅडमिंटन हॉल येथे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी एन.सी.सी. विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी योग शिक्षिका सौ. साक्षी जयंत बोवलेकर यांनी मार्गदर्शन व योगाचे सादरीकरण करुन उपस्थितांकडून योग करुन घेतले. यामध्ये ताडासन, वज्रासन, पद्मासन, शवासन इ.आसन करुन घेतली.
या कार्यक्रमासाठी उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक प्रा.डी.जी.शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.एच.डी. गावडे, प्रा.व्ही. डी.गावडे आदि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी डॉ.एम.बी.चौगुले यांच्या हस्ते योग शिक्षिका साक्षी बोवलेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.