वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी हेमंत किरुळकर

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी हेमंत किरुळकर

 

वेंगुर्ला

 

      वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार हेमंत मारुती किरुळकर यांनी स्वीकारला आहे. ते पुणे महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान, वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची नुकतीच नागपूर महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. नूतन मुख्याधिकारी श्री. किरुळकर यांचे वेंगुर्ले नगरपरिषद तर्फे स्वागत करण्यात आले.