सरंद येथे संगमेश्वर तालुका कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मॅट नर्सरी प्रात्यक्षिक.

सरंद येथे संगमेश्वर तालुका कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मॅट नर्सरी प्रात्यक्षिक.

रत्नागिरी.

   संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मॅट नर्सरी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
   तालुका कृषी अधिकारी संगमेश्वर, मा. मंडळ कृषी अधिकारी आरवली, यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे सरंद ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे आज शुक्रवारी श्री शंतनू बापट यांच्या शेतावर मॅट नर्सरी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी उपस्थित राहून उपस्थित शेतकऱ्यांना MREGS फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे, MIDH, SMART, PMFAME, MAHA DBT - कृषी यांत्रिकीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, PM KISAN, या विषयी मार्गदर्शन केले. तसेच खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले, तसेच कृषी सहाय्यक श्री बी. पी. दोंड यांनी यंत्राद्वारे भात लागवडीसाठी मॅट नर्सरी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. एक रुपयात भात व नाचणी पिक विमा योजना, pm kisan e kyc-npci mapping, गादी वाफ्यावर बियाणे पेरणी करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी श्री सुभाष नलावडे माजी सभापती, श्री संतोष बाळाराम गोटेकर प्रगतशील शेतकरी, पो.पाटील. श्री नंदन भागवत व आदी शेतकरी उपस्थित होते.