भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सिंधुदुर्ग
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी रचना पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपा विविध मोर्चा व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचना पूर्ण करताना जिल्ह्यातील १४ मंडल यांच्या रचना जाहीर झालेल्या असून त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी रचनासुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण ९२१ बूथप्रमुख, २२७ शक्तीकेंद्र प्रमुख, प्रत्येक मंडलात ६१ पदाधिकारी व सदस्य, ९१ जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्या नियुक्त्या पूर्ण करून आता विविध मोर्चा आणि आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक रचना पूर्ण करणारा भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यातील एकमेव पक्ष आहे. या रचनांच्या आधारे भाजपा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत यश मिळविण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी केली.विविध मोर्चा आणि आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक यामध्ये उमेश रघुनाथ सावंत किसान मोर्चा, महेश (छोटू) मधुकर पारकर, ओबीसी मोर्चा, मंगेश आत्माराम म्हस्के आदिवासी मोर्चा, गौतम शरद खुडकर अनुसूचित जाती मोर्चा, निसार अहमद शेख अल्पसंख्यांक मोर्चा अशी निवड करण्यात आली आहे. तसेच प्रकोष्ठ, सेल, आघाडी जिल्हा संयोजक निवडीमध्ये रविंद्र मनोहर मडगावकर सहकार आघाडी, संतोष हरिश्चंद्र कानडे अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ, श्रीकृष्ण (राजू)अविनाश परब सोशल मिडीया, मंदार दिनकर कल्याणकर अभियंता प्रकोष्ठ, वसंत महादेव तांडेल मच्छीमार सेल, डॉ प्रशांत मधुकर मडव वैद्यकीय सेल, बाबुराव अर्जुन कविटकर माजी सैनिक सेल, अनिल शामू शिंगाडे दिव्यांग सेल, अशोक शांताराम राणे कामगार आघाडी, चारुदत्त कृष्णाजी सोमण पदवीधर प्रकोष्ठ, निलेश सदानंद तेंडूलकर ज्येष्ठ कार्यकर्ता सेल, नवलराज विजयसिंह काळे भटके विमुक्त आघाडी, सिद्धार्थ माधव भांबुरे कायदा सेल, योगेश मनोहर फणसळकर क्रीडा प्रकोष्ठ यांना स्थान देण्यात आले आहे.